ग्रुप ग्रामपंचायत आलोंडे

  सन २०११ च्या जनगणनेनुसार या ग्रामपंचायत ची  लोकसंख्या सुमारे १५७४ आहे. ग्रामपंचायत हद्दीमध्ये मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ०४ , अंगणवाडी केंद्रे ०७, तसेच समाजमंदिर-०३ अशी शैक्षणिक व सामाजिक सुविधा उपलब्ध आहेत.

     ग्रामपंचायत क्षेत्रात पिण्याच्या पाण्याच्या सोईसाठी हातपंप, विद्युतपंप , विहिरी तसेच  नळपाणी पुरवठा योजना कार्यरत आहेत,ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील वसुरी बु।। गावात हरिहर शिव मंदिर, सिध्दीविनायक गणेशमंदीर, वेताळ मंदीर, व गावदेवी मंदिर आहे, आणि  व आवंढे गावात गावदेवी मंदिर व वाघोबा मंदीर आहे.

वसुरी बु।।,आवंढे   ग्रामपंचायत हि वाडा  तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे २० कि.मी. अंतरावर वसलेले आहे. दोन्ही गावाचे एकूण लागवडी योग्य  क्षेत्रफळ १८६.०७ हे आर  व वन खालील क्षेत्र ६९० हे.आर असून ग्रामपंचायतीमध्ये ३ वार्ड आहेत. एकूण १०५१ कुटुंबे येथे वास्तव्यास असून, लोकसंख्या १५७४  आहे. त्यामध्ये   पुरुष ८७३ व  महिला ७०१ यांचा समावेश होतो.

गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने एका बाजूला डोंगर असून शेतीयोग्य जमीन तसेच  वना खालील जमिन मोठ्या प्रमाणात आहे.तसेच गावालगत वैतारणा नदी असून  ज्यामुळे पिकांना पाणीपुरवठा होतो . येथे हवामान उष्णकटिबंधीय आहे; उन्हाळ्यात तापमान साधारणतः ४२°से. पर्यंत जाते, तर हिवाळ्यात २३°से. पर्यंत खाली येते. पावसाळ्यात सरासरी ८० ते ९८ से.मी. पर्जन्यवृष्टी होते.

ग्रामपंचायत वसुरी बु।।,आवंढे येथे भात शेती प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात केली जाते. त्याच बरोबर रब्बी पिके व भाजीपाला शेती सुद्धा मुबलक प्रमाणात केली जाते.

 

लोकसंख्येची माहिती

 
क्रमांकक्षेत्रतपशील
एकूण लोकसंख्या
१५७४
पुरुष लोकसंख्या
८७३
महिला लोकसंख्या
७०१

उपलब्ध पायाभूत सुविधा

क्रमांकसुविधा प्रकारउपलब्ध (होय/नाही)संख्यारस्त्याने जोडलेले (होय/नाही)
ग्रामपंचायत कार्यालयहोयहोय
प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC)नाही 0नाही 
उपकेंद्र (Sub Center)होय

1

होय
अंगणवाडीहोय

11

होय
प्राथमिक शाळाहोय8होय
माध्यमिक शाळाहोय2होय
उच्च माध्यमिक शाळानाही 0नाही  
महाविद्यालय / व्यावसायिक केंद्रहोय2होय
समुदाय भवन (Community Hall)नाही 0नाही
१०स्वस्त दर दुकान (PDS)होय3होय
११श्मशानभूमी / स्मशानभूमीहोय6नाही
१२इंटरनेट / मोबाईल टॉवरहोय2नाही
१३सीएससी केंद्र (CSC Center)होय1होय

 

प्रशासकीय संरचना

ग्रामपंचायत बँक माहिती

खाते नाव: 

बँकेचे नाव : 

शाखेचे नाव: 

अकाउंट नंबर : 

आई एफ एस सी कोड :

पत्ता :